Renault Kiger : सध्या सर्वच कारच्या किमती खूप वाढल्या आहेत. पण जर तुम्हाला बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. कार 8 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल. या कारमध्ये 405 लिटरची बूट स्पेस आणि 19 Kmpl मायलेज मिळेल.
किमतीबद्दल बोलायचे झाले तर Renault कारचे टॉप मॉडेल 13.98 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये येते. NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले असून ज्यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहेत. ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे तुम्हाला लांबचा प्रवास करताना थकवा येत नाही.
उच्च पॉवर इंजिन पॉवर
Renault Kiger ही पाच सीटर कार असून ज्यात शक्तिशाली 999 cc इंजिन देण्यात येत आहे. यात कंपनी 405 लिटरची बूट स्पेस देत असून कंपनीच्या शानदार कारमध्ये RXE, RXL, RXT, RXT (O) आणि RXZ असे पाच प्रकार उपलब्ध आहेत. या कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. तर कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल.
मिळेल 5 स्पीड गिअरबॉक्स आणि दमदार मायलेज
नवीन कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतील, ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये 71.01 ते 98.63 bhp पर्यंतची पॉवर सहजपणे तयार करते. या कंपनीचा असा दावा आहे की कारला कमाल 19 kmpl पर्यंत मायलेज मिळेल. तर या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.
Renault Kiger मध्ये मिळतील स्मार्ट फीचर्स
- कार 7 मोनोटोन आणि 4 ड्युअल टोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.
- यात स्वयंचलित हवामान नियंत्रण मिळेल.
- तीन ड्रायव्हिंग मोड नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स.
- 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
- क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस चार्जर.
- अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम.
- या कारला 16 इंच टायर आकार दिला आहे.