Renault Duster : लवकरच बाजारात Renault आणणार नवीन Duster, जाणून घ्या खासियत

Renault Duster : भारतीय बाजारात लवकरच Renault नवीन Duster लाँच करणार आहे. कार Kia Carens, Hyundai Alcazar आणि Tata Harrier, Mahindra XUV700 या कारसोबत स्पर्धा करेल.

नवीन डस्टरचे नाव

भारतात पुनरागमन करणाऱ्या डस्टरचे नाव बिगस्टर असण्याची शक्यता आहे. ज्याचा 7 सीटर व्हेरिएंट देखील लॉन्च केला जाईल. कारला मोठा व्हीलबेस मिळेल. नवीन सीटरची लांबी सुमारे 4.6 मीटर असेल. कारमध्ये डोअर मोल्डिंग्स, व्हील आर्क डिझाईन, रनिंग बोर्ड्सवरील साइड बॉडी क्लेडिंग मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. सध्या या कारची चाचणी सुरू करण्यात आले आहे.

जाणून घ्या फीचर्स

नवीन रेनॉल्ट डस्टर CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार केले जात असून प्रगत ड्रायव्हिंग आणि कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान यामध्ये पाहायला मिळते. कारमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सह इतर अनेक सेफ्टी फीचर्स मिळतील.

नवीन डस्टरचे इंजिन

कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाल्यास 3ऱ्या रांगेतील सीट वगळता त्यात फारसे बदल दिसत नाहीत. यात 10.1-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये आढळतील. कारमध्ये 1.6L ई-टेक हायब्रिड पॉवरट्रेन इंजिन असेल जे 140bhp ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल.

कधी होणार भारतात लाँच?

हे लक्षात घ्या की नवीन डस्टरची चाचणी सुरू झाली आहे, ज्यावरून अंदाज वर्तवला जात आहे की ही कार पुढील वर्षाच्या मध्यात म्हणजेच 2025 मध्ये लॉन्च केली जाईल. किमतीचा विचार केला तर रेनॉल्ट डस्टर 7 सीटरची एक्स-शोरूम किंमत 14 लाख ते 18 लाख रुपये दरम्यान असेल. भारतात कार Kia Carens, Hyundai Alcazar आणि Tata Harrier, Mahindra XUV700 आणि MG Hector सारख्या कॉम्पॅक्ट SUV सोबत स्पर्धा करेल.

Leave a Comment