Renault Duster : धमाकेदार फीचरसह लवकरच बाजारात येणार 7 सीटर Renault, मिळेल उत्तम मायलेज

Renault Duster : बाजारात लवकरच धमाकेदार फीचरसह 7 सीटर Renault Duster लाँच होणार आहे. जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हि कार उत्तम पर्याय असणार आहे. यात उत्तम मायलेज मिळेल.

परंतु बदलत्या काळानुसार डस्टर स्वतःला अपग्रेड करू शकले नाही. विक्रीतील घसरणीमुळे कंपनीला ते बंद करावे लागले होते. असे जरी असले तरी पण आता डस्टर नव्या अवतारात लॉन्च होणार आहे. म्हणजेच यावेळी कंपनी संपूर्ण फॅमिली क्लासला टार्गेट करेल. नवीन डस्टर कधी येणार आहे आणि त्यात काय खास असू शकते जाणून घेऊयात सविस्तर.

7 सीटर डस्टर

सध्या, 7 सीटर मारुती एर्टिगा ही बाजारात सर्वात जास्त विक्री करणारी MPV आहे. रेनॉल्ट ट्रायबर हे देखील परवडणारे ७ सीटर मॉडेल असून त्याची विक्री फारशी चांगली नाही. ट्रायबरच्या जागी कंपनी आता डस्टर बाजारात आणेल असे मानले जात आहे. खरंतर कंपनी हे करू शकते कारण डस्टर हे नाव खूप लोकप्रिय आहे.

असे डिझाइन

रिपोर्ट्सनुसार, रेनॉल्ट नवीन डस्टरवर वेगाने काम करत असून नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाईल. यावेळी नवीन डस्टरच्या डिझाइनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. नवीन ग्रिलपासून ते नवीन बोनेट आणि बंपरपर्यंत, नवीन एलईडी हेडलाइट्स देखील समोर दिसतील. तर साइड प्रोफाइल आणि रिअर लूकमध्ये नवीन डिझाइन उपलब्ध असेल.

इंटिरियर

आता नवीन डस्टरचे इंटीरियर अधिक प्रीमियम बनवण्याचे प्रयत्न करण्यात येत असून नवीन मॉडेलमध्ये टच स्क्रीन डिस्प्ले असेल जो कनेक्ट केलेल्या फीचरसह सुसज्ज असणार आहे. याशिवाय, यात पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी जागा मिळेल. इंजिन आणि पॉवरसाठी, हे 1.2L आणि 1.5L पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले जाईल. भारतात नवीन डस्टरची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्याची थेट टक्कर मारुती एर्टिगाशी होणार आहे.

Leave a Comment