Renault Duster । कारप्रेमींनो, भारतीय बाजारात लवकरच धुमाकूळ घालणार रेनॉल्ट डस्टर; पहा किंमत

Renault Duster । भारतीय बाजारात आता लवकरच रेनॉल्ट डस्टर लाँच होणार आहे. यात कंपनीकडून EBD, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड, हिल असिस्ट दिले जाणार आहे. जाणून घ्या कारची किंमत.

डस्टर हा भारतातील एक विश्वासार्ह ब्रँड असून त्याचे पुन्हा लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. सूत्रानुसार, यावेळी डस्टर त्याच्या मागील आवृत्तीपेक्षा मोठा आणि चांगला असणार आहे. त्याचा नवीन अवतार 7 सीटर असणार आहे. म्हणजेच कंपनीने फॅमिली क्लासवर लक्ष केंद्रित केले असून कंपनीच्या नवीन रेनॉल्ट डस्टर CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल. भारतीय बाजारात परवडणाऱ्या ७ सीटर कारला खूप मागणी आहे. सध्या, रेनॉल्टकडे ट्रायबरच्या रूपात परवडणारी 7 सीटर कार असून सध्याच्या 7 सीटरच्या जागी डस्टर लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.

असे असेल रेनॉल्ट डिझाइनमध्ये नावीन्य

रेनॉल्ट आपले नवीन डस्टर पूर्णपणे नवीन शैलीत सादर करणार आहे. या वर्षी सणासुदीच्या आधी ते लॉन्च करण्यात येईल. नवीन डस्टरचे पुढील, बाजू आणि मागील प्रोफाइल पूर्णपणे बदलले जाणार असून बदल त्याच्या परिमाणांमध्ये दिसू शकतात. त्याची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. 5 मोठ्या आणि 2 लहान मुलांसाठी बसण्याची जागा असणार आहे. पण या कारमध्ये बूट स्पेसची समस्या असू शकते.

नवीन इंटीरियर

नवीन डस्टरच्या इंटिरिअरमध्ये केवळ नवीनपणाच नाही तर काही चांगल्या अत्याधुनिक फीचर्सचा त्यात समावेश केला आहे. त्याच्या डॅशबोर्डची रचना किगर आणि ट्रायबरसारखी असेल.

तसेच कंपनीची नवीन डस्टर 1.0L आणि 1.2 पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाईल. यात मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सची सुविधा पाहायला मिळेल. रेनॉल्टची ही दोन्ही इंजिने कंपनीच्या इतर कारला आधीच पॉवर देत असून ही दोन्ही इंजिने परफॉर्मन्स आणि मायलेजच्या बाबतीत चांगली आहेत. पण डस्टरसोबत ते पुन्हा जोडले जातील. सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये EBD, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड, हिल असिस्ट आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह 3 पॉइंट सीट बेल्ट यांसारखी फीचर्स आहेत.

किमतीचा विचार केला तर नवीन डस्टरची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. कारची थेट स्पर्धा मारुती एर्टिगा आणि किया केरेन्सशी असणार आहे. या दोन्ही वाहनांनी भारतात आधीच स्वत:ची स्थापना केली असल्याने आता नवीन डस्टरला थोडे कष्ट करावे लागतील.

Leave a Comment