Renault Austral E-Tech Hybrid Car : Renault घेऊन येतेय नवीन हायब्रीड कार, मिळेल 1000 किमी मायलेज; जाणून घ्या फीचर्स

Renault Austral E-Tech Hybrid Car : Renault च्या कार्सना भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. असे असल्याने Renault सतत आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. अशातच कंपनीची हायब्रीड कार बाजारात लाँच होणार आहे. यात 1000 किलोमीटरचे मायलेज मिळेल.

मिळेल 1000 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज

हे लक्षात घ्या की Austral E-Tech Hybrid ची चाचणी भारतात पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या या शानदार कारमध्ये 1.3-लिटर टर्बो पेट्रोल आणि मोठ्या बॅटरी पॅकसह इलेक्ट्रिक मोटर दिसेल. कंपनीच्या या नवीन कारमध्ये कॉम्प्लेक्स हायब्रीड सिस्टीम असल्याचं बोललं जात असल्याने नवीन कारला 200 hp चा पॉवर मिळतो. इतकेच नाही तर कार पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 1000 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

मिळतील हायटेक फीचर्स

Renault Austral मध्ये मोठी टचस्क्रीन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात तुम्हाला 50 पेक्षा जास्त ॲप मिळू शकतात. इतकेच नाही तर तुमच्यासाठी गुगलची बिल्ट-इन सिस्टीम देखील उपलब्ध करून दिली जाईल. या कारला प्रीमियम फीचर म्हणून हेड्स-अप डिस्प्ले पाहायला मिळेल आणि अलॉय व्हीलसह एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प्स बसवले आहेत.

हे लक्षात घ्या की नवीन ऑस्ट्रल खूप छान लुक घेऊन येणार आहे. त्याचा क्रॉसओवर लुक खूपच प्रेक्षणीय असेल. यात 19-इंच अलॉय व्हील्स असणार आहेत. कार चालकांना पूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये शहराच्या वेगाने ही कार चालवता येईल.

भारतात कधी होणार लॉन्च?

रेनॉल्टच्या नवीन ऑस्ट्रल ई-टेक हायब्रीड कारबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत कंपनीची ही शानदार कार भारतात लॉन्च केली जाईल. सध्या तरी या कारची चाचणी सुरू आहे किंवा ही हायब्रीड प्रणाली इतर कोणत्यातरी मॉडेलमध्ये सादर करण्यात येत आहे. इतकेच नाही तर नवीन डस्टरमध्ये ही हायब्रीड सिस्टीम आणली जाऊ शकते असेही बोलले जात आहे. ही SUV चांगली इंधन कार्यक्षमता देऊ शकते.

Leave a Comment