Drive in Monsoon : पावसाळ्यात कार चालवताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर याल संकटात

Drive in Monsoon : पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही कार चालवत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.

विंडशील्ड वाइपर

विंडशील्ड वायपर योग्यरित्या काम करत नसेल तर पावसात वाहन चालवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे आजच कारचे वायपर तपासा आणि जर ते नीट काम करत नसल्यास त्वरित बदलून घ्या. तसेच अतिवृष्टीदरम्यान दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी होते. यामुळे सुरक्षित वाहन चालवण्यासाठी, विंडशील्ड वायपर चांगल्या कामाच्या स्थितीत असावे.

कारचा वेग

पाऊस खूप जास्त असल्यास तुमच्या वाहनाचा वेग फक्त 20kmph ठेवा, कारण या वेगाने वाहन योग्य प्रकारे नियंत्रित करता येते. त्याशिवाय अतिवेगाने वाहन चालवले तर वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन अपघाताचा धोका वाढतो. पावसात आपत्कालीन ब्रेक लावणे शक्यतो टाळा.

लेन मध्ये चालवा कार

अनेकजण घाईगडबडीत लोक वाहने बदलून वाहन चालवतात. पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या स्वत:च्या लेनमध्ये गाडी चालवा, असे केले तर तुम्ही सुरक्षित राहाल. पावसामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचे बळी ठरतात. त्यामुळे जितक्या काळजीपूर्वक गाडी चालवाल तितका फायदा तुम्हाला होईल.

ब्रेक

पावसाळ्यात ब्रेक लावताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पावसात नेहमी सावधपणे आणि कमी वेगाने वाहन चालवणे गरजेचे आहे. पुढे जाणाऱ्या वाहनापासून योग्य अंतर राखणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील घसरणीचे प्रमाण वाढून ब्रेक लावल्यानंतरही टायर आपली पकड राखू शकत नसल्याने वाहन घसरण्याचा धोका वाढतो.

कार सर्व्हिसिंग

हे लक्षात घ्या की पावसाळ्यापूर्वी गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यावी, कारण पावसाळ्यात ब्रेकडाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

Leave a Comment