Petrol Price : सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर (Petrol Diesel New Price) केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही बदल झालेला नाही, दर कायम आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 44 व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.
IPO News : चालू वर्षातही IPO चा पाऊस.. ‘इतक्या’ कंपन्यांनी केलीय जोरदार तयारी; जाणून घ्या.. https://t.co/0xAYUd1sWE
— Krushirang (@krushirang) June 29, 2022
दिल्लीत (Delhi) पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे.
पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.04 रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर मिळत आहे. परभणीत पेट्रोल 114.42 रुपये तर डिझेल 98.78 रुपये दराने विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.49 रुपये आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
Vodafone Idea Recharge Plan : Jio आणि Airtel कडे सुद्धा नाही ‘हा’ खास प्लान; पहा, काय आहेत फायदे.. https://t.co/MNhc7sWfuQ
— Krushirang (@krushirang) June 30, 2022
दरम्यान, सध्या इंधनाच्या दरात कोणतीही वाढ होताना दिसत नाही. दुसरीकडे मात्र कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर मात्र वाढत चालले आहेत. तरी देखील सरकारने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या इंधनाचे दर मात्र वाढलेलेच आहेत. एक लिटर पेट्रोलने शंभरचा टप्पा केव्हाच पार केला आहे. दुसरीकडे सीएनजी (Compressed Natural Gas) आणि एलपीजी गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढत आहे.
Petrol-Diesel Price : आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ.. जाणून घ्या मुंबईत किती झाले दर