Reliance Plan : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) 221 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि विविधीकरणासाठी येत्या काळात 2.75 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार आहे. ऑक्टोबरमध्ये 5G दूरसंचार सेवा सुरू करून रिलायन्स त्याच्या मूळ तेल आणि रसायनांच्या व्यवसायात क्षमता वाढवेल. यासोबतच कंपनीने दैनंदिन वापराच्या उत्पादनांच्या विभागात (FMCG) उतरण्याची घोषणा करून प्रतिस्पर्धी अदानी समूहाला (Adani Group) स्पर्धा देण्याची तयारीही केली आहे.
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही RIL च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अंबानी यांनी या सर्व घोषणा केल्या. ते म्हणाले की, यावर्षी दिवाळीपर्यंत रिलायन्स जिओ (Reliance Jio) दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात Jio 5G ऑफर केली जाईल. ते म्हणाले की समूह 5G सेवा सुरू करण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
रिलायन्स रिटेल, रिलायन्स इंडस्ट्रीजची किरकोळ शाखा, आता विस्तार योजनेचा भाग म्हणून स्वतःच्या ब्रँडसह FMCG क्षेत्राची व्याप्ती वाढवेल. रिलायन्स रिटेल (Reliance Retail) ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असून 15,196 स्टोअर्स किराणा माल आणि इतर विविध उत्पादने विकतात. या क्षेत्रात कंपनीची थेट स्पर्धा अदानी यांच्या बरोबर होईल. ज्यांनी अलीकडेच अंबानींना मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अदानी समूहाची अदानी विल्मार (Adani Wilmar) ही कंपनी पॅकेज्ड फूडसाठी खाद्यतेल बनवते. ही देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी आहे.
याशिवाय, अंबानींनी अतिशय स्वस्त 5G स्मार्टफोन आणि Google क्लाउड विकसित करण्यासाठी Google सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ते पुढे म्हणाले की कंपनीने आता भारतासाठी (India) 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी क्वालकॉमशी करार केला आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या पारंपरिक व्यवसायात पेट्रोकेमिकल क्षमता वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. बाजार मूल्यानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून स्थापित, रिलायन्स तंत्रज्ञान आणि नूतनीकरणक्षम उर्जेच्या दिशेने आपल्या व्यवसायात विविधता आणण्याचा विचार करत आहे.