Reliance Jio : जिओचा धमाका! अनलिमिटेड 5G डेटासह मोफत पाहता येणार चित्रपट आणि वेब सिरीज

Reliance Jio : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी सतत ऑफर देखील आणत असते. कंपनीने सध्या असेच काही प्लॅन आणले आहेत ज्यात तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटासह चित्रपट आणि वेब सिरीज मोफत पाहता येतील.

रिलायन्स जिओचा 398 रुपयांचा शानदार प्लॅन

Jio चा हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येत असून इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळेल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 6 GB अधिक डेटा मिळेल. पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.

हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देत असून या प्लॅनचे सदस्यत्व घेणाऱ्या वापरकर्त्यांना Sony Liv, Jio Cinema आणि ZEE5 यासह एकूण 12 OTT ॲप्सचा मोफत प्रवेश मिळेल.

रिलायन्स जिओचा ९०९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन ८४ दिवस चालत असून या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा मिळेल. 399 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असून कंपनीचा हा प्लॅन Sony Liv, Zee5 आणि Jio TV सोबत Jio Cinema मध्ये मोफत प्रवेश देतो. कंपनीच्या प्लॅनचे ग्राहक फक्त जिओ टिव्ही मोबाइल ॲपवरून सोनी लिव्ह आणि जिओ टिव्ही मोबाइल ॲप ॲक्सेस करतील.

रिलायन्स जिओचा 1198 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची असून यात इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा देण्यात येत आहे. कंपनी या प्लानमध्ये यूजर्सना 18 GB अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. इतर दोन योजनांप्रमाणे, पात्र वापरकर्ते अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेता येईल.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. एकूण 14 OTT ॲप्सच्या मोफत प्रवेशासह ही योजना येत असून यात प्राइम व्हिडिओ मोबाइलसह डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्हसह जिओ सिनेमा आणि ZEE5 यांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment