Reliance Jio : Jio चा जबरदस्त प्लॅन! 50 दिवस मोफत घ्या अनलिमिटेड डेटासह Netflix आणि प्राइम व्हिडिओचा आनंद

Reliance Jio : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीने असाच एक प्लॅन आणला आहे, ज्यात सगळ्यात जास्त वेगवान इंटरनेट, 50 दिवस मोफत सेवा, Netflix आणि प्राइम व्हिडिओचा आनंद घेता येत आहे.

Jio Fiber चा 2499 रुपयांचा शानदार प्लॅन

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे Jio Fiber चा हा प्लॅन 12 महिन्यांसाठी 29,988 रुपये + GST ​​भरून सबस्क्राइब करता येतो. 12 महिन्यांसाठी या योजनेची सदस्यता घेतली तर तुम्हाला 50 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे.

कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये 500Mbps ची अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळत आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा मिळेल. हा प्लॅन ५५० पेक्षा जास्त मोफत टीव्ही चॅनेलसह येतो. प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसह 14 ओटोटी ॲप्सचा मोफत प्रवेश मिळत असून या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगही मिळते.

3999 रुपयांचा प्लॅन

हे लक्षात घ्या की या प्लॅनची ​​वार्षिक सदस्यता Rs 47,988 + GST ​​मध्ये येते. यात तुम्हाला अमर्यादित डेटा आणि 1Gbps स्पीड देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग मिळेल. हा प्लॅन 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलच्या विनामूल्य प्रवेशासह येतो. यात कंपनीला Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सोबत अनेक उत्तम OTT ॲप्सवर मोफत प्रवेश मिळत आहे. विशेष म्हणजे यात 50 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते.

8499 रुपयांचा प्लॅन

1Gbps इंटरनेट स्पीडसह या प्लॅनच्या वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला 101988 रुपये खर्चावे लागणार आहेत. 12 महिन्यांसाठी प्लॅनचे सदस्यत्व घेतले तर तुम्हाला 50 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी अमर्यादित डेटा मिळत असून यात ५५० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल येतात. यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टारसह Sony Liv वर मोफत प्रवेश देखील मिळत आहे.

Leave a Comment