मुंबई : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त प्लान ऑफर करते. जिओचे काही रिचार्ज प्लान एकदम खास आहेत कारण, ते स्वस्त आहेत आणि अधिक फायदे देतात. आज आम्ही तुम्हाला Reliance Jio च्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत, जिथे सर्व OTT प्लॅटफॉर्मचे फायदे कमी किमतीत उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. या प्लान्सची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे.
रिलायन्स जिओच्या 239 रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. यामध्ये जिओ यूजर्स एकूण 42 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. डेटा संपल्यानंतर, प्रति जीबी 10 रुपये आकारले जातात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याबरोबरच सर्व नेटवर्कवर फ्री कॉल सुविधाही उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओच्या 296 रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये जिओ यूजर्स एकूण 25 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, तुम्ही एका दिवसात किंवा अगदी 30 दिवसात 25 GB पूर्ण करू शकता. प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, सर्व नेटवर्कवर मोफत कॉल सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Jio अॅप JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे.
दरम्यान, अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओचे प्लान किफायतशीर आहेत. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांतही वाढ होत आहे. व्होडाफोन-आयडीया कंपनीचे ग्राहक प्रामुख्याने जिओकडे वळत आहेत. त्याचा फायदा कंपनीला होत आहे. व्होडाफोन आयडीया सध्या आर्थिक संकटात आहे. आणि अन्य कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे प्लानही जास्त फायदा देत नसल्याचे सांगण्यात येते. त्यात आता कंपनी पुन्हा रिचार्ज प्लानचे दरात वाढ करण्याचा विचार करत आहे.