Reliance Jio : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत आपले रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे कोट्यवधी ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अनेक शानदार ऑफर घेऊन येत असते. कंपनीने आपले काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
जिओचा २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Jio चा हा २४९ रुपयांचा असून तो 23 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 23 दिवसांसाठी, ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. या कालावधीत ग्राहकांना एकूण 46GB डेटा मिळेल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud वर मोफत प्रवेश मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.
जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीचा हा 299 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात 28 दिवसांसाठी, ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण वैधता कालावधीत ग्राहकांना एकूण 56GB डेटा मिळेल. यात JioTV, JioCinema आणि JioCloud वर मोफत प्रवेश मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.
जिओचा ३८८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीचा हा 388 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये 28 दिवसांसाठी ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतील. संपूर्ण वैधता कालावधीत एकूण 56GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन ९० दिवसांसाठी पूर्णपणे मोफत मिळेल. कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud वर मोफत प्रवेश मिळेल. तसेच पात्र ग्राहक अमर्यादित 5G डेटा ऑफर घेऊ शकतात.
जिओचा ३९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीचा हा 398 रुपयांचा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS मिळेल. या प्लॅनमध्ये 12 OTT सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. ज्यात JioCinema Premium, Lionsgate Play, Sony LIV, ZEE5, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, DocuBay, EPIC ON आणि Hoichoi यांचा समावेश असून तुम्ही हे सर्व OTT ॲप्स JioTV मोबाइल ॲपवर पाहू शकता. कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये JioTV आणि JioCloud चा प्रवेश मिळेल. प्लॅनमध्ये 6GB अतिरिक्त डेटा मिळेल.