Reliance Jio : मुंबई : रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. कंपनीने Disney + Hotstar ची मोफत सेवा देणारे अनेक प्रीपेड प्लॅन बंद केले (reliance jio discontinues plans offering disney plus hotstar free) आहेत. डिस्ने + हॉटस्टार जिओच्या 499, 601, 799, 1099, 333, 419, 583, 783 आणि 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत उपलब्ध होते. आता या योजना बंद करण्यात आल्या आहेत. डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करणार्या जिओच्या पोर्टफोलिओमध्ये आता फक्त दोन योजना शिल्लक आहेत. हे प्लॅन 1499 आणि 4199 रुपयांचे आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये कंपनी इतर कोणते फायदे देत आहे ते जाणून घेऊ या.
जिओच्या 1499 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. प्लानमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2 जीबी डेटा देत आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. कंपनी या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह Jio अॅपमध्ये मोफत प्रवेश देखील देत आहे.
4199 रुपयांचा हा प्लान 365 दिवसांचा आहे. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB नुसार एकूण 1095 GB डेटा मिळेल. कंपनी या प्लानमध्ये दररोज 100 मोफत एसएमएससह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल देखील देत आहे. या प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह Jio अॅप मोफत प्रवेश मिळेल. Jio च्या या दोन्ही प्लानमध्ये Disney + Hotstar चे एक वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन (Free Subscription) मिळेल.
जिओने आपल्या प्लान्समध्ये अनेक बदल केले आहेत. दरवाढही केली आहे. त्यामुळे आता जिओ सुद्धा अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या रांगेत आले आहे. आधी या कंपनीचे प्लान किफायतशीर ठरत होते. त्यामुळे लोकांनी जिओला पसंती दिली होती. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. कंपनी आता अनेक प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यात कपात करत आहे.
- Recharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये फायदाच फायदा.. जिओलाही टाकले मागे; जाणून घ्या..
- BSNL : बीएसएनएलची भन्नाट ऑफर; 599 रुपयांचा प्लॅन मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात जाणुन घ्या डिटेल्स
- Airtel 5G Plus Service : एअरटेलने दिली खुशखबर.. पहा, तुम्हाला काय-काय मिळणार मोफत ?