Jio : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) काही खास ऑफर (Offer) जाहीर केल्या आहेत. Jio ने आपल्या Jio Fiber प्लान्सच्या विक्रीत वाढ करण्यासाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. ज्याला कंपनीने ‘हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर’ (हर घर तिरंगा, हर घर Jio Fiber) असे नाव दिले आहे. या ऑफर अंतर्गत Jio Fiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लानच्या ग्राहकांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता (Validity) दिली जात आहे. आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.
‘हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर’ नवीन Jio Fiber कनेक्शन खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 दरम्यान Jio Fiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लान खरेदी केल्यास तुम्हाला 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. म्हणजेच तुमचा प्लान आणखी 15 दिवस टिकेल. तथापि, त्याचे अॅक्टिव्हेशन 19 ऑगस्ट 2022 पूर्वी करायला हवे. ही ऑफर फक्त 499, 599, 799 आणि 899 रुपयांच्या प्लानसाठी लागू आहे. ही ऑफर फक्त 6 किंवा 12 महिन्यांच्या प्लानवर लागू आहे. Jio चे विद्यमान JioFiber युजर या ऑफरचा लाभ घेऊ शकत नाहीत.
जिओचा नवीन 750 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान 90 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रतिदिन लाभ देतो. हा Jio चा पहिला प्लान आहे जो पूर्ण तीन महिन्यांसाठी 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. आतापर्यंत Jio चे प्लान फक्त 84 दिवस चालत होते. यासोबतच Jio चा एक रुपयाचा प्लान देखील क्लब करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत 90 दिवसांसाठी 100MB डेटा ऑफर केला जात आहे.