Jio Recharge Plan : देशातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स (Postpaid Plan) आहेत. बहुतेक कुटुंबांमध्ये, वेगवेगळे लोक त्यांच्या इंटरनेटसाठी वेगवेगळे रिचार्ज करतात. पण जिओच्या या जबरदस्त प्लानमुळे आता तसे करण्याची गरज राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा प्लानबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा (Unlimited Data) मिळतो. हा प्लान जिओ फायबरचा (Jio Fiber) आहे, ज्याची किंमत 399 रुपये आहे.
SBI: SBI ने ग्राहकांना दिली मोठी भेट; आता तुम्हाला घरी बसून मिळणार 35 लाख, जाणून घ्या कसे https://t.co/E0ZgiERGUG
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
आम्ही ज्या प्लानबद्दल माहिती देत आहोत तो जिओचा ब्रॉडबँड प्लान (Broadband Plan) आहे. Jio Fiber च्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत 399 रुपये आहे. विशेष म्हणजे, प्लानमध्ये इतका डेटा उपलब्ध आहे की कुटुंबात 5 लोक राहत असले तरी हा डेटा कमी पडणार नाही. वास्तविक, या प्लानमध्ये कंपनी एका महिन्यासाठी अमर्यादित डेटा देत आहे. तुम्हाला डेटा स्पीड 30Mbps मिळणार आहे. याद्वारे 10 स्मार्टफोन आणि अनेक स्मार्ट उपकरणे कनेक्ट करू शकता. खास गोष्ट म्हणजे यामध्ये अनलिमिटेड कॉल सुविधा देखील देण्यात आली आहे. कॉल सुविधेमुळे तुमच्या स्मार्टफोनला रिचार्ज करण्याची गरजही राहणार नाही.
Ukraine Crisis : युद्धामुळे ‘त्या’ श्रीमंत देशांना बसला झटका.. पहा, कसे कोसळलेय अर्थकारण.. https://t.co/AIWmKmN0Rz
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
जर तुमचे वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू असेल तर याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. याशिवाय, ते तुमच्या स्मार्ट टीव्हीवरून इतर उपकरणांनाही इंटरनेट पुरवेल. त्यामुळे अन्य खासगी कंपन्याच्या तुलनेत हा प्लान फायदेशीर ठरेल असे म्हणण्यास हरकत नाही. तरी देखील प्लान खरेदी करताना अन्य कंपन्यांच्या प्लानची माहिती घेणेही फायद्याचे राहिल.
फक्त एकाच रिचार्जमध्ये 5 लोक टेन्शन फ्री; टेलिकॉम कंपन्यांचे ‘हे’ आहेत बेस्ट फॅमिली पोस्टपेड प्लान..