मुंबई – रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) वेगवेगळ्या किंमतींचे अनेक प्रीपेड प्लान आहेत. कमी किमतीत अधिक वैधता असलेला प्लान उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 84 दिवसांची वैधता (Validity) देतो. या प्लानची किंमत 395 रुपये आहे. वास्तविक, हा प्रीपेड प्लान (Prepaid Plan) Jio वेबसाइटवर सहजासहजी दिसत नाही. हा प्लान शोधण्यासाठी, तुम्हाला मूल्य श्रेणीमध्ये जावे लागेल.
जिओचा 395 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओचा हा 400 रुपयांपेक्षा स्वस्त प्लान 84 दिवसांची वैधता देतो. 84 दिवसांचा हा Jio चा सर्वात स्वस्त प्लान आहे. यामध्ये 6 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलसह 1000 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. याबरोबरच Jio अॅप फ्री सब्सक्रिप्शन (Free Subscription) देखील आहे.
एअरटेल-व्होडाफोन प्लान
अशा वैशिष्ट्यांसह एअरटेलच्या (Airtel) प्लानची किंमत 455 रुपये आहे, तर Vodafone Idea ही सुविधा 459 रुपयांमध्ये देत आहे. हे दोन्ही प्लान 84 दिवसांसाठी फक्त 6 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर करत आहेत. Airtel प्लानमध्ये एकूण 900 SMS आणि Vodafone Idea प्लानमध्ये 1000 SMS देत आहे.
सध्या कमी किंमतीत प्लान सादर करण्यात टेलिकॉम कंपन्यांत स्पर्धा सुरू आहे. कमी किंमतीत चांगले प्लान देत असल्याचे कंपन्यांकडून भासवले जात आहे. मात्र, या प्लानबद्दल आधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर कंपन्या या प्लान फार फायदे देत नसल्याचे स्पष्ट होते. एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया कंपन्यांच्या रिचार्ज प्लानचे दर जास्त आहेत. या कंपन्या फायदेही कमी देतात. आता तर कंपन्यांनी प्लानच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे.
Jio Recharge Plan : जिओचा धमाका..! अगदी कमी किंमतीत आणलाय ‘हा’ खास प्लान; जाणून घ्या, डिटेल..