Voter ID: घरी बसल्या आता करता येणार मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Voter ID: केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी संपूर्ण देशात 7 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत.

या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. जर तुमच्याकडे अद्याप देखील मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही आता घरी बसल्या बसल्या मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.या लेखात जाणून घ्या कि, तुम्हाला घरी बसल्या बसल्या मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करता येते.

मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक अट

मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी, नागरिकाने काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत. मतदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे आणि तो भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल.

ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा हायस्कूलची मार्कशीट देऊ शकता.

Maruti WagonR CNG मिळत आहे फक्त 1 लाख रुपयांत; जाणून घ्या ‘ही’ गोल्डन ऑफर

तर रेशनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा युटिलिटी बिल, फोन किंवा वीज पत्ता पुराव्यासाठी वापरता येईल.

मतदार ओळखपत्र ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

स्टेप 1- नवीन नोंदणीसाठी, सर्वप्रथम तुम्हाला voters.eci.gov.in वर जावे लागेल.

स्टेप 2- येथे ‘New registration for General Electors’ हा पर्याय दिसेल आणि नंतर Fill Form 6 दिसेल. ज्यावर क्लिक करायचे.

स्टेप  3- या स्टेपनंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि नंतर अकाउंट तयार केल्यानंतर, तुम्हाला पुढील प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल.

स्टेप  4- फॉर्म 6 भरण्यासाठी, तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल. ज्यात कागदपत्रे आणि फोटोंचा समावेश आहे.

रूम राहणार थंड, वीज बिलही येणार खूपच कमी! खरेदी करा पोर्टेबल एसी, किंमत आहे फक्त ….

स्टेप  5- आता तपशीलांची पडताळणी करावी लागेल आणि नंतर सबमिट करावी लागेल.

Leave a Comment