Reduce Screen Time : ‘स्क्रीनटाइम’ कमी कराच! जाणून घ्या, काय मिळतात फायदे?

Reduce Screen Time : तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या जीवनात अनेक बदल झाले आहेत आता (Reduce Screen Time) आपले बहुतेक काम स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर होते त्यामुळे स्क्रीनटाईममध्ये (Screentime) खूप वाढ झाली आहे. स्क्रीनवर जास्त वेळ राहिल्याने आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनच्या जास्त वापरामुळे एकीकडे मानसिक आरोग्याबरोबरच तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. दुसरीकडे शारीरिक आरोग्यासोबतच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या आजारांबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे दृष्टी देखील कमकुवत होऊ लागली आहे.

संवाद कमी होणे, सर्जनशीलता कमी होणे आणि आत्मविश्वासातही कमी होणे यांसारख्या समस्या देखील स्क्रीन वेळ वाढल्याचे परिणाम आहेत. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्क्रीनटाईम कमी करणे यासंबंधी काय फायदे मिळू शकतात हे आज आपण जाणून घेऊ या…

Reduce Screen Time

Common Mistakes : सावधान! जेवणानंतर करताय ‘या’ चुका, आजच टाळा; नाहीतर होईल गंभीर परिणाम

झोपेचे चक्र सुधारते

लॅपटॉप आणि मोबाईलचा स्क्रीनटाइम कमी केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते इतकेच नाही तर नैसर्गिक प्रकाशात राहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो जास्त वेळ कट स्क्रीनकडे न पाहिल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होत नाहीत.

तणाव कमी होतो

जास्त स्क्रीन टाईम तुमच्या तणावामध्ये वाढ करू शकतो तर कमी स्क्रीन टाईम तुम्हाला अधिक संवेदनशील आणि शांत होण्यास मदत करतो. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉप वरील स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या तणावातही कमी येते. आजच्या युगात मोबाईल आणि लॅपटॉप वरील स्क्रीन टाईम कमी करणे तसे अवघडच आहे कारण या दोन उपकरणांवरच बहुतेक काम अवलंबून असते तरीदेखील वेळात वेळ काढून स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करा.

Reduce Screen Time

Human Development Index : भारतीयांची कमाई घटली की वाढली? पहा, अहवाल काय सांगतो..

अन्य कामांसाठी वेळ मिळतो

स्क्रीन टाईम कमी झाल्याने तुम्हाला अन्य कामे करण्यासाठी वेळ मिळतो यामुळे आरोग्याच्या समस्या फारस्या उद्भवत नाहीत वेगळी कामे केल्याने मनालाही प्रसन्नता मिळते जसे की पुस्तकांचे वाचन करणे, प्रवास करणे, एखादा खेळ खेळणे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे या गोष्टींसाठी वेळ मिळतो.

स्वतःकडे लक्ष देता येते

लॅपटॉप आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केल्याने तुम्हाला तुमची ध्येय आणि जीवनातील उद्देशाकडे जाण्यासाठी अधिक वेळ मिळेल जे तुम्हाला स्वयंप्रेरित ठेवते आणि संतुलन राखण्यास मदत करते या व्यतिरिक्त सोशल मीडियावरील वेळ कमी करण्यासाठी मदत मिळते.

आरोग्यदायक जीवनशैली

लॅपटॉप मोबाईल टीव्हीचा स्क्रीन टाईम कमी करून तुम्ही निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करू शकता ज्यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते व्यायाम पौष्टिक आहार आणि वेळेवर झोप यांसारख्या गोष्टी तुम्हाला सहज करता येणे शक्य होते.

Leave a Comment