Redmi Smartphone : चायनीज कंपनी रेडमीचे दमदार स्मार्टफोन (Redmi Smartphone) अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. Amazon वर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. अशा परिस्थितीत कंपनी ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील आणि डिस्काउंट देत आहे. तुम्ही परवडणारा स्मार्टफोन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला रेडमी फोनवर उपलब्ध असलेल्या मोठ्या डीलबद्दल माहिती देणार आहोत.
खरं तर आम्ही Redmi A2 स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. Redmi चा हा परवडणारा फोन 2GB + 32GB, 2GB + 64GB आणि 4GB + 64GB अशा तीन प्रकारांमध्ये येतो. परंतु, सध्या 2GB + 64GB व्हेरिएंट अतिशय कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. Redmi A2 च्या 2GB + 64GB ची किंमत लॉन्चच्या वेळी 6,499 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, आता फेस्टिव्हल डिस्काउंटनंतर हा प्रकार 6,199 रुपयांना लिस्ट झाला आहे. म्हणजेच येथे ग्राहकांना 300 रुपयांची सूट दिली जात आहे.
याशिवाय, Redmi A2 च्या 2GB + 64GB व्हेरिएंटवर कोणत्याही बँक कार्ड व्यवहारावर 900 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. अशाप्रकारे ग्राहकांसाठी या फोनची प्रभावी किंमत 5,299 रुपये होईल. हा फोन एक्वा ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि सी ग्रीन कलर पर्यायांमध्ये येतो. अॅमेझॉनवर या फोनवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. येथे ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करून 5,850 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Redmi A2 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Helio G36 प्रोसेसर, 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले, 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप, 5MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतो.