Redmi Smartphone Offer : प्रत्येकवर्षी Xiaomi आपले अनेक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. यातील काही फोन जास्त महाग असतात, जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही आता स्वस्तात Xiaomi चे फोन खरेदी करू शकता. Amazon ने एक शानदार ऑफर आणली आहे.
भारतीय बाजारात, कंपनीने अनेक रॅम आणि स्टोरेज प्रकारांमध्ये Redmi Note 13 Pro 5G सादर केला असून या फोनला अलीकडेच किमतीत कपात मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे तो आता सवलतीच्या दरात सूचीबद्ध करण्यात आला आहे. किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर 24,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 26,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात सूचीबद्ध केला आहे.
मिळेल विशेष सवलत
Amazon ग्रेट समर सेल ऑफरमध्ये, समजा ग्राहकांनी ICICI बँक, BoB कार्ड किंवा OneCard क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास 2000 रुपयांपेक्षा जास्त सवलत देण्यात येत आहे. अशाप्रकारे, केवळ 21,999 रुपयांमध्ये सर्वात कमी किमतीत हा फोन तुमचा असेल. तुम्हाला हा फोन कोरल पर्पल, आर्क्टिक व्हाइट आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
समजा ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करायचा असल्यास त्यांना 23 हजार रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. इतकेच नाही तर एक्सचेंज डिस्काउंटचे मूल्य जुन्या डिव्हाइसच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय, तुम्हाला बँक किंवा एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल.
जाणून घ्या फीचर्स
Xiaomi फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षणासह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले व्यतिरिक्त, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
या फोनच्या मागील पॅनलवर, 200MP Samsung ISOCELL HP3 सेन्सर (OIS+EIS) सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर 16MP सेल्फी कॅमेरा असणाऱ्या फोनची 5100mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान करण्यात आली आहे.