Redmi Note 13 Pro : आज कमी किमतीमध्ये Xiaomi चे स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालत आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स मिळत असल्याने Xiaomi स्मार्टफोनला बाजारात मोठी मागणी आहे.
यातच आता Xiaomi आपले 2 नवीन स्मार्टफोन Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ लाँच करण्याच्या विचारात आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये 5,020mAh बॅटरी आणि 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. TENAA सर्टिफिकेशन साइटवर दोन नवीन रेडमी फोन स्पॉट झाले आहेत.
दोन्ही हँडसेट Redmi Note 13 Pro आणि Note 13 Pro+ असू शकतात. TENAA साइटवर मॉडेल क्रमांक 2312DRA50C आणि 2312DRA50C सह लिस्टिंग आहे. दोन्हीं स्मार्टफोन 5G समर्थित असतील आणि त्यात 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले असेल. लीक झालेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर Redmi Note 13 Pro+ 1TB स्टोरेज आणि 18GB रॅमसह लॉन्च केला जाऊ शकतो. तर Redmi Note 13 Pro 16GB रॅम सह बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.
TENAA सूचीने असेही सुचवले आहे की आगामी दोन्ही स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 200-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असू शकतो. तर, सेल्फी प्रेमींसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Redmi Note 13 Pro आणि Note 13 Pro+ मध्ये अनुक्रमे 5,020mAh बॅटरी आणि 4,880mAh बॅटरी दिली जाऊ शकते. हे जाणुन घ्या Redmi Note 12 Pro+ 5G आणि Redmi Note 12 Pro 5G या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आले होते. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 1080 SoCs चिप वापरण्यात आली आहे.
Redmi Note 12 Pro+ 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 200-मेगापिक्सेल सॅमसंग HPX सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.