Redmi Note 13 Pro 5G । 200MP कॅमेरा असणाऱ्या Xiaomi फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Redmi Note 13 Pro 5G । तुम्ही आता 200MP कॅमेरा असलेल्या Xiaomi फोनवर प्रचंड सवलत मिळत आहे. अशी शानदार ऑफर Amazon वर मिळत आहे. यामुळे तुमची हजारोंची बचत होऊ शकते.

Amazon वर Redmi Note 13 Pro 5G साठी मर्यादित काळातील डील ऑफर केली जात असून स्मार्टफोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे याचा कॅमेरा सेटअप आहे आणि या फोनच्या मागील पॅनलवर 200MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. या कॅमेरा सेटअपसह, 4X झूम OIS आणि EIS समर्थनासह उपलब्ध असून मजबूत कार्यक्षमतेसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 5G प्रोसेसर मिळेल.

Xiaomi स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 24,999 रुपयांना लिस्ट केला आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह व्हेरिएंट 28,999 रुपयांच्या किंमतीला लॉन्च केला होता. SBI क्रेडिट कार्ड, ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि इतर निवडक बँक कार्ड्ससह पेमेंट केले तर या फोनसाठी 3000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे आणि फक्त 21,999 रुपये भरावे लागतील.

जुन्या फोनची देवाणघेवाण करून नवीन फोन खरेदी केला तर तर त्यांना 23,749 रुपयांपर्यंत कमाल एक्सचेंज सूट मिळू शकते. त्याचे मूल्य जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. हा फोन आर्कटिक व्हाईट, कोरल पर्पल, स्कार्लेट रेड आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Xiaomi फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच AMOLED डिस्प्ले असून तो गोरिल्ला ग्लास व्हिक्टस द्वारे संरक्षित आहे. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि 1800nits चा पीक ब्राइटनेस मिळेल. या शानदार फोनचा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे आणि मागील पॅनलवर 200MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा उपलब्ध आहे. 16MP सेल्फी कॅमेरा फोनच्या 5100mAh बॅटरीला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळाला आहे.

Leave a Comment