Redmi Note 13 5G : पहिल्यांदाच ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येतोय Redmi चा सर्वाधिक विक्री करणारा फोन, पहा ऑफर

Redmi Note 13 5G : जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे सध्या सर्वच स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे. त्यामुळे खरेदीदार आता कमी किमतीत जास्त फीचर्स देणारे फोन खरेदी करतात. तुम्ही आता Amazon च्या सेलचा लाभ घेऊन Redmi चा सर्वात जास्त विक्री करणारा फोन खरेदी करू शकता. हा फोन तुम्हाला 1300 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.

Redmi Note 13 5G वर मिळेल सवलत

तुम्हाला Amazon सेलमध्ये हा फोन बँक डिस्काउंटनंतर 2,500 रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करता येईल. डिस्काउंटनंतर कंपनीच्या या फोनची किंमत फक्त 15,499 रुपये इतकी आहे. अशाप्रकारे, जर तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असल्यास तरच तुम्हाला 1500 रुपयांची झटपट सवलत मिळू शकेल. इतकेच नाही तर तुम्हाला फोनवर एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळू शकते. तुम्हाला फोनवर 15000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल.

मिळतील शानदार विशेष फीचर्स

Redmi Note 13 5G मध्ये 6.67 इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, तर या फोनचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits पर्यंत आहे. Note 13 5G फोन 6nm MediaTek Dimensity 6080 चिपने सुसज्ज असून कंपनीच्या या फोनमध्ये एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप, ॲम्बियंट लाइट आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करेल.

Redmi Note 13 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात 108MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे, तर फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. Redmi Note 13 5G मध्ये 5,000mAh बॅटरी असणार आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, GPS, USB टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक पर्याय देण्यात आला आहे.

Leave a Comment