Redmi Note 12 Pro 5G: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या अॅमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर जबरदस्त सेल सुरू आहे.
ज्या अंतर्गत तुम्ही कमी किमतीमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, फ्रिज आणि इतर वस्तू खरेदी करू शकतात. यातच जर तुम्ही देखील कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या या सेलमध्ये Redmi च्या पॉवरफुल स्मार्टफोन्सवर 50 टक्के सूट दिली जात आहे.
जर तुम्ही Redmi स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला काही जबरदस्त स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत ज्यांना तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकतात.
Redmi 12c
या सेलमध्ये Redmi 12C स्मार्टफोनचे 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट 50 टक्के डिस्काउंटसह विकले जात आहेत. या स्मार्टफोनची खरी किंमत 13,999 रुपये आहे, परंतु तुम्ही Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान 6,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Redmi 12
Redmi 12 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 40 टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे. हे फ्लिपकार्ट सेलमध्ये 8,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
Redmi Note 12 Pro 5G
Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 40 टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे. त्याची मूळ किंमत 39,999 रुपये आहे, परंतु तुम्ही ती 24,000 रुपयांना खरेदी करू शकता.
Redmi a2
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Redmi A2 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 42 टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे. तुम्ही हे 6,313 रुपयांना खरेदी करू शकता.
Redmi 11 Prime
Redmi 11 Prime चे 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्ट सेलमध्ये 39 टक्के डिस्काउंटसह विकले जात आहे. हा स्मार्टफोन 10,249 रुपयांना खरेदी करता येईल.