Redmi 13 C : 8 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा 50MP कॅमेरा असणारा तगडा फोन, पहा फीचर्स

Redmi 13 C : हल्ली स्मार्टफोनला जास्त मागणी असल्याने सर्वच कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या किमती खूप झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना बजेट कमी असल्याने फोन खरेदी करता येत नाही. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हालाही जबरदस्त फीचर्स असणारा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

आता तुम्ही रेडमीचा Redmi 13 C हा फोन देखील खरेदी करू शकता, जो 8 GB रॅम पर्यंत आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये येतो. ज्यावर तुम्हाला 7,400 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ घेता येईल. पण हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असते.

जाणून घ्या फीचर्स

कंपनी आपल्या या फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंच डॉट ड्रॉप डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यामध्ये गोरिल्ला ग्लास दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून, यात कंपनीचा MediaTek Helio G85 चिपसेट आर्म Mali- G52 MC2 GPU दिला आहे.

फोटोग्राफीसाठी कंपनीच्या फोनमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा Redmi फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.3 आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत.

Leave a Comment