Redmi 11 Prime : फ्लिपकार्ट सतत अनेक सेल उपलब्ध करून देत असते. अशातच आताही फ्लिपकार्टने आपली एक शानदार सेल आणली आहे. या सेलमधून तुम्ही Redmi चा 50MP AI कॅमेरा असणारा फोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारोंची बचत करू शकता.
फ्लिपकार्टच्या या सेलमधून तुम्ही Redmi 11 Prime हा फोन खरेदी करू शकता. यात कंपनीकडून 8GB RAM आणि उत्तम फीचर्स दिली आहेत. हे लक्षात घ्या की तुम्हाला या सेलचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे.
जाणून घ्या Redmi 11 Prime ऑफर
किमतीचा विचार करायचा झाला तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला Redmi 11 Prime चा हा फोन 6000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 8,999 रुपयांना विकला जात आहे. हे लक्षात घ्या की Redmi ने Redmi 11 Prime स्मार्टफोन Rs 14,999 मध्ये लॉन्च केला होता.
यासोबतच Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केले तर 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. जुन्या फोनची देवाणघेवाण करणाऱ्यांना 6000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज सवलत तुमच्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून आहे.
Redmi 11 प्राइमची फीचर्स
Redmi च्या बजेट स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. मजबूत परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देखील दिला आहे. Redmi 11 Prime च्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असून ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा सोबत 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. दीर्घ बॅकअपसाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.