Healthy Recipe : कारले हे पोषक तत्वांनी युक्त आहे. विशेषत: मधुमेहाच्या (Diebetes) रुग्णांना कारले खाण्यास सांगितले जाते. कारण ते रक्तातील साखर (Sugar) कमी करण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण करल्याचे थेपले बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. गुजराती खाद्यपदार्थ थेपला ही एक प्रसिद्ध पाककृती आहे. ते बनवणे अगदी सोपे आहे. कारल्याचं नाव ऐकताच अनेकांना नको वाटते. कारण कारले चवीला कडू असते. मात्र, हेच कारले आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.चला तर मग जाणून घेऊ या कारल्याचे तिखट थेपले बनवण्याची सोपी पद्धत.
साहित्य – सोललेली कारली – 1/2 कप, बाजरीचे पीठ – 1/2/2 कप, गव्हाचे पीठ – 1 कप, लसूण – 1/2 चमचा, लाल तिखट – 1 चमचा, हळद – 1/2 चमचा, धने पावडर – 1 चमचा, कोथिंबीर – 2 चमचे, तेल – आवश्यकतेनुसार, मीठ – चवीनुसार.
रेसिपी
कारल्यापासून बनवलेला थेपला बनवण्यासाठी सर्वात आधी कारल्याच्या साली सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत. यानंतर, एक वाटी घ्या, त्यात बाजरीचे पीठ आणि गव्हाचे पीठ चांगले मिसळून घ्या. यानंतर त्यात लाल तिखट, हळद, बारीक केलेला लसूण, धनेपूड, बारीक केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.
आता थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. मळताना पीठ किंचित मऊ असेल हे लक्षात ठेवा. पीठ तयार झाल्यावर त्याचे गोळे बनवा आणि गोल आकार द्या. यानंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरून तयार थेपली बेक करायला ठेवा. काही वेळाने थेपला उलटा करून दुसरीकडे तेलाने भाजून घ्या. हवे असल्यास तेल न लावता रोटीप्रमाणे भाजता येते. थेपला त्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर तयार थापल्या प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे सर्व पिठापासून एक एक करून थेपले तयार करा. तुमचा पौष्टिक कारल्याचा थेपला तयार आहे. हे भाजी किंवा चटणी बरोबर सर्व्ह करता येते.