अहमदनगर : रव्याद्वारे अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रवा इडली, रवा डोसा, रवा उपमा हे खाद्य पदार्थ तर आपण नेहमीच पाहतो. रव्याचे टोस्ट कधी तयार केले आहेत का. हा खाद्यपदार्थ थोडासा वेगळा आहे. आपण कधी तयार केलेला नसेलही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला रवा टोस्ट कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. रवा टोस्ट काही मिनिटात तयार होता. त्यात तुम्ही अनेक भाज्या टाकू शकता. चला तर मग रवा टोस्ट कसा तयार करायचा याबाबत माहिती घेऊ या..
साहित्य – अर्धा कप रवा, अर्धा कप दही, २ बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 सिमला मिरची, कोथिंबीर, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, 6 ब्रेडचे तुकडे, अर्धा कप हिरवी चटणी, 2 चमचे लोणी किंवा तूप.
रेसिपी
रवा टोस्ट बनवण्यासाठी प्रथम अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी एका भांड्यात टाकून मिक्स करावे. आता त्यात बारीक केलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. आता त्यात अर्धा चमचा साखर आणि मीठ टाका. त्यात किसलेले पमनीर आणि गाजर सुद्धा टाकू शकता. हे मिश्रण 10 मिनिटे बाजूला ठेवा. तोपर्यंत ब्रेडचे तुकडे घेऊन त्यावर हिरवी चटणी पसरवा. वाटल्यास ब्रेडच्या बाजू काढू शकता. आता रव्याचे मिश्रण ब्रेडवर पसरवा.
आता तवा गरम करा. त्यावर लोणी किंवा तूप टाका. ब्रेडची बाजू ज्यावर मिश्रण लावले जाते ती बाजू भाजून घ्या. आता वरच्या बाजूला बटर लावा आणि ब्रेड पलटून दुसऱ्या बाजूने बेक करा. अशा पद्धतीने सर्व ब्रेडचे तुकडे भाजून घ्या. त्यानंतर तुमचे टेस्टी रवा टोस्ट तयार होतील. तुम्ही चहा किंवा चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.
Recipe : उन्हाळ्यात हलका नाश्ता हवाय.. मग, दही डोसा ठरेल बेस्ट पर्याय.. ही आहे सोपी रेसिपी..