अहमदनगर : बटाटे आणि टोमॅटो हे आपल्या आहाराचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याशिवाय आपल्याकडील आहराची कल्पना करणे अशक्य आहे. बटाटे आणि टोमॅटोचा वापर अन्नात अनेक प्रकारे केला जातो. बटाटे आणि टोमॅटो मिसळूनही अनेक भाज्या बनवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला बटाटा टोमॅटो कोरडी भाजी बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. कुठेतरी बाहेरगावी निघायचे असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचा खाद्यपदार्थ असो, बटाट्याची टोमॅटो भाजी चांगला पर्याय ठरू शकतो. हे अगदी सहज बनवता येते आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊ या या रेसिपीबद्दल..
साहित्य- उकडलेले बटाटे 4, टोमॅटो 2, हिरवी मिरची 2, कांदा 1, जिरे 1 चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, हळद 1/4 चमचा, कसूरी मेथी 1 चमचा, तेल 2 चमचे, कोथिंबीर 1 चमचा, मीठ चवीनुसार.
रेसिपी
बटाटा आणि टोमॅटोची कोरडी भाजी करण्यासाठी प्रथम बटाटे उकडून आणि सोलून घ्या. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक केलेला कांदा टाकून चांगले परतून घ्या. कांदा सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. आता कढईत उरलेल्या तेलाच्या व्यतिरिक्त थोडे अधिक तेल टाका. आता तेलात जिरे, कसुरी मेथी, लाल तिखट, हळद आणि इतर मसाले टाकून चांगले परतून घ्या.
मसाले भाजल्यावर त्यात बारीक केलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून तळून घ्या. टोमॅटो मऊ होईपर्यंत तळा. यानंतर त्यात चिरलेला कांदा आणि उकडलेले बटाटे टाका. त्यानंतर सर्वकाही चांगले मिसळा. आता भाजीत थोडे पाणी टाकून झाकण ठेवून शिजू द्या. सुमारे 10 मिनिटे भाजीचे पाणी कोरडे होईपर्यंत शिजू द्या. शेवटी भाजीत कोथिंबीर टाकून मिसळून घ्या. तुमची स्वादिष्ट बटाटा टोमॅटो कोरडी भाजी तयार आहे. गरमागरम रोटी किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करा.
Todays Recipe : अगदी कमी वेळात तयार करा टेस्टी बेसन-कांदा भाजी; रेसिपीही एकदम सोपी..