अहमदनगर – आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना डब्यात रोज काय द्यायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. शाळा सकाळी असेल तर अशा वेळी डब्यात काहीतरी हलके खाद्य पदार्थ देण्याकडे कल असतो. अशा वेळी तुम्ही कमी वेळात तयार होणार ब्रेड रोल (Bread Roll) देऊ शकता. तसे पाहिले तर सकाळच्या नाश्त्यासाठीही (Breakfast) हा एक चांगला पर्याय आहे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळात तयार होते.
साहित्य – ब्रेड स्लाइस 6, किसलेले पनीर 3 चमचे, बटाटे उकडलेले 3, कांदा बारीक केलेला 1, स्वीट कॉर्न 3 चमचे, मटार 3 चमचे, अद्रक-लसूण पेस्ट 1 चमचा, हिरव्या मिरच्या 2, लाल तिखट अर्धा चमचा, हळद 1/4 चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, कोथिंबीर 2 चमचे, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार.
रेसिपी
ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम बटाटे (Potato) उकळून एका भांड्यात मॅश करा. आता कांद्याचे बारीक तुकडे करा, त्यानंतर पनीर (Paneer) किसून घ्या. आता एका कढईत 3 चमचे तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक केलेला कांदा (Onion) टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळा. आता अद्रक-लसूण पेस्ट आणि बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या. आता कांद्याच्या मिश्रणात स्वीट कॉर्न आणि मटार टाकून शिजू द्या. आता या मिश्रणात मॅश केलेले बटाटे टाका आणि चांगले मिसळून घ्या. नंतर या मिश्रणात तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाका. आता सारणात कोथिंबीर टाका. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
आता ब्रेडचे तुकडे घ्या आणि बाजूंनी कट करून घ्या. आता ब्रेड स्लाइस पाण्यात एक सेकंद भिजत ठेवा आणि नंतर बाहेर काढा आणि पाणी काढून टाका. आता सारण घेऊन ब्रेडवर लाटून घ्या, नंतर दोन्ही हातांच्या मदतीने रोल करा. आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ब्रेड रोल्स टाकून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये वेगळे काढा. या पद्धतीने सर्व ब्रेड रोल तयार करा. अशा पद्धतीने कमी वेळात तुम्ही ब्रेड रोल तयार करू शकता.
Todays Recipe : कमी वेळात तयार करा टोमॅटो राइस.. ही आहे एकदम सोपी रेसिपी..