Recipe : आपल्याकडे रोजच्या आहारात भेंडीची भाजी नेहमीच दिसते. भेंडीची (Ladyfinger) भाजी आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असते. ही भाजी विविध पद्धतीने तयार केली जाते. भेंडी फ्रायचे नाव आपण कधीतरी ऐकले असेलच. आज आम्ही तुम्हाला भेंडी फ्राय तयार करण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. भिंडी फ्राय बनवण्याची पद्धत फार अवघड नाही आणि ती केव्हाही तयार करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ या भेंडी फ्राय कशी तयार करतात ते.

साहित्य – भेंडी – 250 ग्रॅम, कांदा – 1, हिरवी मिरची – 1-2, लसूण 2 ते 3, जिरे – 1 चमचा, धने पावडर – 1 चमचा, लाल तिखट – 1/2 चमचा, हिंग – चिमूटभर, आमचूर पावडर – 1/2 चमचा, हळद – 1/2 चमचा, गरम मसाला – 1/2 चमचा, तेल – 2 चमचे, मीठ – चवीनुसार.

रेसिपी

भेंडी फ्राय करण्यासाठी, प्रथम भिंडी पाण्यात धुऊन घ्या. नंतर चाळणीत ठेवा आणि थोडा वेळ ठेवा. त्यानंतर भेंडीचे तुकडे करून एका भांड्यात बाजूला ठेवा. यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि लसूण यांचेही बारीक तुकडे करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि चिमूटभर हिंग टाकून तळून घ्या. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात बारीक केलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण टाकून परतून घ्या. कांद्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत परता. हे होण्यासाठी 3-4 मिनिटे लागू शकतात.

कांद्याचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात हळद, धने पावडर, लाल तिखट आणि इतर कोरडे मसाले घालून मिसळून घ्या. काही वेळाने भेंडी टाकून भाजी शिजू द्या. आता पॅन झाकून भाजी मंद आचेवर 7-8 मिनिटे शिजू द्या. भेंडी मऊ झाली की गॅस बंद करा. अशा पद्धतीने स्वादिष्ट भेंडी फ्राय तयार आहे. रोटी, पराठा बरोबर सर्व्ह करा.

Share.

Leave A Reply

Exit mobile version