Recharge Plan । Jio आणि Airtel च्या करोडो वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. तुम्ही आता या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 20 पेक्षा जास्त मोफत OTT प्लॅटफॉर्म वापरू शकता. तसेच तुम्हाला यात अमर्यादित कॉलिंग आणि 5G डेटा देखील मिळेल.
एअरटेलचा 359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलचा हा प्लान 1 महिन्याच्या वैधतेसह येत असून तुम्हाला या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २.५ जीबी डेटा वापरायला मिळेल. 5G नेटवर्क असलेल्या भागात राहणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी अनलिमिटेड 5G डेटा देत आहे, हे लक्षात घ्या.
तसेच 5 रुपयांच्या टॉकटाइमसह या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. ही योजना Airtel Xstream Play सह येते, ज्यात तुम्हाला 20 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा मोफत प्रवेश मिळेल.
एअरटेलचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीच्या 28 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB डेटा वापरायला मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी 5G नेटवर्क क्षेत्रातील वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. हा प्लॅन Airtel Xstream Play च्या सदस्यत्वासह येते जी २० पेक्षा जास्त OTT ॲप्समध्ये प्रवेश देते. यात तुम्हाला विंक म्युझिकचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळेल.
जिओचा 398 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येत असून या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. कंपनी पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देत आहे. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. आनंदाची बाब म्हणजे कंपनीचा हा प्लॅन 12 हून अधिक OTT ॲप्समध्ये प्रवेश देतो, ज्यात Sony Liv आणि Zee5 सह Jio Cinema समाविष्ट आहे.