Recharge Plan : होईल बचतच बचत! लाँच झाला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या अधिक

Recharge Plan : Vi ही लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी शानदार रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. यात तुम्हाला Disney + Hotstar आणि Sony LIV चा लाभ घेता येईल.

प्रीपेड वापरकर्त्यांसाठी Vi चा नवीन रिचार्ज प्लॅन

  • किमतीचा विचार केला तर 169 रुपयांचा नवीन Vi स्पेशल डेटा ॲड-ऑन प्लॅन प्रीपेड वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी Disney+ Hotstar चे सदस्यत्व देतो. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन फक्त 30 दिवसांसाठी वैध आहे आणि 8GB डेटा ऑफर करतो.
  • तसेच हे लक्षात घ्या की 82 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी वैध 4GB डेटासह SonyLIV प्रीमियमची 28-दिवसांची सदस्यता देखील देते.
  • याशिवाय कंपनीच्या 369 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रीपेड वापरकर्त्यांना 30 दिवसांसाठी SonyLIV प्रीमियम स्ट्रीमिंग, 2GB प्रति डेटा आणि 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो.
  • समजा जर तुम्हाला दीर्घ मुदतीचे सबस्क्रिप्शन हवे असल्यास तुम्ही Vi च्या 903 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. इतकेच नाही तर यात SonyLIV प्रीमियम मोबाईलचे 90 दिवसांचे सबस्क्रिप्शन, प्रतिदिन 2GB डेटा आणि 90 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलचा समावेश करण्यात आला आहे.

पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी Vi चे रिचार्ज प्लॅन

  • पोस्टपेड वापरकर्त्यांना क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यांचा आनंद घेण्यासाठी विविध डेटा ॲड-ऑन पॅकचे सदस्यत्व घेता येईल.
  • किमतीचा विचार केला तर 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20GB डेटा आणि Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी असणार आहे.
  • तसेच 100 रुपयांचा ॲड-ऑन पॅक 10GB डेटा आणि SonyLIV प्रीमियम सबस्क्रिप्शन देतो.
  • इतकेच नाही तर Vi Max आणि Vi फॅमिली प्लॅन्स, 401 रुपयांपासून सुरू होत असून मोबाइल स्क्रीनसाठी Disney+ Hotstar आणि SonyLIV प्रीमियम या दोन्हींचे सदस्यत्व देतात.

Leave a Comment