Recharge Plan : मोफत मिळणार अनलिमिटेड 5G डेटा! फक्त करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम

Recharge Plan : Jio आणि Airtel या देशातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. जर तुम्ही या दोन्हीपैकी एका कंपन्यांचे ग्राहक असाल तर तुम्ही आता मोफत अनलिमिटेड 5G डेटा मिळवू शकता. कसे ते जाणून घ्या.

Jio आणि Airtel या दोघांनीही त्यांच्या 5G सेवा भारतात आणल्या असून या दोन्ही कंपन्यांचे सदस्य कोणतेही अतिरिक्त पैसे न देता अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. हे लक्षात घ्या की या कालावधीत, 5G डेटा मिळविण्यासाठी अट आहे की वापरकर्त्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे आणि या कंपन्यांच्या 5G सेवा त्याच्या क्षेत्रात उपलब्ध असणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर वापरकर्त्याच्या नंबरवर कमीत कमी २३९ रुपयांचा रिचार्ज ॲक्टिव्ह असावा, अशीही अट आहे.

असा मिळवा स्वस्तात अनलिमिटेड 5G डेटा

तुम्ही 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज केला तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा मिळेल. अशा वेळी तुम्ही 239 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केला तर ते अधिक चांगले होईल कारण ते इतर कोणत्याही महागड्या प्लॅनसारखेच फायदे देते. समजा तुम्ही 5G वापरकर्ते नसाल तर तुम्हाला दररोज मर्यादित डेटा मिळेल परंतु तुम्ही मागील सर्व अटींचे पालन केले तर तुम्ही अमर्यादित 5G चा आनंद घेऊ शकाल.

रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येईल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याचा पर्याय देखील देण्यात येतो आणि 4G वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा मिळतो. वापरकर्त्यांना JioTV, JioCinema आणि JioCloud ॲप्समध्ये प्रवेश देखील देण्यात येत आहे.

एअरटेलचा 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हे लक्षात घ्या की एअरटेल वापरकर्त्यांना 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 24 दिवसांच्या वैधतेचा लाभ मिळतो. वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. समजा जर तुम्ही 4G वापरकर्ते असाल तर तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळेल. इतकेच नाही तर इतर फायद्यांच्या यादीमध्ये अमर्यादित 5G डेटा, मोफत HelloTunes आणि Wynk Music ऍक्सेस इ. समावेश आहे.

Leave a Comment