Recharge Plan Offer : 10 रुपयांपेक्षा स्वस्तात येतोय ‘हा’ रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलसह 60 दिवसांपर्यंत मिळेल डेटा

Recharge Plan Offer : रिलायन्स जिओ आणि Airtel या देशातील दोन दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आहेत. कंपन्या सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. ज्याचा फायदा देखील कंपन्यांच्या ग्राहकांना होत असतो.

एअरटेलचा 519 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची ​​60 दिवसांची वैधता 519 रुपये इतकी असून या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅनसह एअरटेलकडून काही इतर फायदे देखील देण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Apollo 24/7 Circle, 100 रुपयांचा Fastag कॅशबॅक, मोफत Hellotunes आणि मोफत Wynk Music देण्यात येत आहे.

जिओचा 529 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

किमतीचा विचार केला तर 56 दिवसांची वैधता असणाऱ्या Jio च्या या प्लॅनची किंमत 529 रुपये इतकी आहे. कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळत आहेत. इतकेच नाही तर यूजर्स सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉल करता येतात. मोफत JioSaavn Pro सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड 5G डेटा, JioSuite ॲप्सचा प्रवेश ही या प्लॅनची ​​खासियत आहे.

कोणता प्लॅन तुमच्यासाठी आहे उत्तम? पहा

Airtel आणि Jio या दोन्ही प्लॅनमध्ये 1.5GB डेटा उपलब्ध असून या दोन प्लॅनमधील सगळ्यात मोठा फरक म्हणजे वैधता. Airtel सुद्धा Jio पेक्षा 10 रुपयांनी 60 दिवसांची वैधता देत असून Jio च्या प्लॅनची वैधता 56 दिवस असून या वैधतेमुळे, दोन प्लॅनमधील एकूण डेटामध्ये फरक आहे. रिलायन्स जिओचा प्लॅन एकूण 84GB डेटा ऑफर करत आहे. इतकेच नाही तर Airtel चा प्लॅन एकूण 90GB डेटा ऑफर करत आहे.

Leave a Comment