Recharge plan offer । सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळेल मोफत कॉलिंगसह अतिरिक्त डेटा, किंमत आहे फक्त..

Recharge plan offer । रिलायन्स जिओ, Airtel, वोडाफोन-आयडिया या देशातील लोकप्रिय टेलीकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांची ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. असाच एक प्लॅन आहे ज्यात तुम्हाला 20GB अतिरिक्त डेटा आणि कॉलिंग मोफत, JioCinema चा 90 दिवस आनंद घेता येईल.

जिओचा 749 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा हा प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह येत असून यात तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. या शानदार प्लॅनमध्ये कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 20 जीबी अधिक डेटा देत असून पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध करून देत आहे.

या शानदार प्लॅनमध्ये जिओ आपल्या यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध करून देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. Jio चा हा प्लॅन Jio TV आणि Jio Cinema च्या मोफत प्रवेशासह येतो. पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला प्लॅनमध्ये Jio Cinema Premium मध्ये प्रवेश मिळणार नाही.

एअरटेलचा 779 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनी या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5 GB डेटा देत असून Airtel च्या 5G नेटवर्कमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. 90 दिवस चालणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस मिळत आहेत.

ही योजना अनेक अतिरिक्त फायद्यांसह येत असून यात तुम्हाला अपोलो 24×7 सर्कलमध्ये तीन महिन्यांसाठी मोफत प्रवेश दिला जात आहे. इतकेच नाही तर तुम्हाला कंपनी विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शनही देत ​​आहे.

Leave a Comment