Recharge Plan : शानदार ऑफर! अवघ्या 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, फायदे जाणून व्हाल चकित

Recharge Plan : सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. अशाच एका कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीच्या ग्राहकांसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे या प्लॅनची किंमत फक्त 1 रुपये आहे.

रिपोर्टनुसार Vi च्या या नवीन प्लानमध्ये 75 पैशांचा टॉक टाइम उपलब्ध आहे आणि या शानदार प्लॅनची वैधता संपूर्ण दिवसासाठी असेल. रिचार्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की कोणताही डेटा किंवा एसएमएस फायदे उपलब्ध नसतील. या प्लॅनसह, रिचार्जच्या बाबतीत, तुम्हाला Vodafone-Idea नेटवर्कवर रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत मोफत ऑन-नेट कॉलिंगचा पर्याय कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ग्राहकांसाठी ठरेल फायदेशीर प्लॅन

नवीन प्लॅन अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे ज्यांनी रु. 99, रु. 198 किंवा रु. 204 प्लॅन रिचार्ज केले आहेत आणि त्यांचा टॉकटाइम संपला आहे. नवीन प्लॅन रिचार्ज करून अशा ग्राहकांना 75 पैशांचा अतिरिक्त टॉकटाइम आणि रात्री मोफत ऑन-नेट कॉलिंगचा लाभ घेता येईल.

तुम्हाला नवीन प्लॅनसह रिचार्ज करायचे असतील तर तुम्ही तुमच्या Vi मोबाइल नंबरवरून १२१५९# डायल करून हा प्लॅन रिचार्ज करू शकता. इतकेच नाही तर हा प्लॅन Vi ॲप किंवा वेबसाइटवरूनही रिचार्ज केला जाऊ शकतो.

कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी 99 रुपयांच्या आणखी एका स्वस्त प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय देखील देत आहे. ज्यात 200MB डेटासह 99 रुपयांचा टॉकटाइम ऑफर करण्यात येत आहे. हा प्लॅन 15 दिवसांची वैधता देत असून याशिवाय, उर्वरित दोन प्लॅन रुपये 198 आणि 204 रुपयांचे आहेत, जे एका महिन्याच्या वैधतेसह अनेक फायदे देतात.

Leave a Comment