Recharge Plan : Airtel समोर Jio आणि Vi या दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आहेत. कंपन्या सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. ज्याचा त्यांच्या ग्राहकांना खूप फायदा होतो. सध्या एक असा प्लॅन आहे जो अवघ्या 1 रुपयात येत आहे.
एअरटेलचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस असून या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो दररोज 3GB डेटा आणि 15 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन प्रदान करतो. ज्यात Sony Liv, Eros Now आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. प्रत्येक अमर्यादित प्लॅनप्रमाणे, हा प्लॅन दररोज मोफत कॉल आणि 100 एसएमएसचा लाभ देतो.
जिओचा 398 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या 398 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस असून या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा देण्यात येतो. दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 13 OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध असून ज्यात Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium आणि बरेच काही फायदे मिळतात.
Vi चा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vi आपल्या वापरकर्त्यांना 399 रुपयांचा एक उत्तम प्लॅन ऑफर करत असून तुम्हाला या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अनेक उत्तम फायदे दिले जात आहेत. या शानदार प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळत आहे. केवळ ॲप ऑफर अंतर्गत, तुम्हाला प्लॅनमध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा विनामूल्य मिळत असून प्लॅनचे सदस्यत्व घेतलेल्या वापरकर्त्यांना कंपनी तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाईलवर मोफत प्रवेश देत आहे. कंपनी प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV वर मोफत प्रवेश देत आहे.
जाणून घ्या फरक?
आपण Airtel, Vi आणि Jio या तीन प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमधील सर्वात मोठा फरक म्हणजे डेटा. जिओ आपल्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा Vi चा प्लान 2.5GB डेटा आणि Airtel चा प्लॅन 3GB डेटा दररोज देत आहे.
एकूण डेटाची गणना केल्यास,केली तर Airtel 84GB डेटा देत तर Jio 56GB डेटा आणि Vi 70GB डेटा देत आहे. 28GB अतिरिक्त डेटा Airtel Jio पेक्षा 1 रुपये जास्त उपलब्ध होता. Airtel ला Jio कडून 3 OTT ॲप्सचा अतिरिक्त फायदा मिळत असून तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन हवे असल्यास Vi चा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम आहे.