Realme Upcoming Smartphone । 24GB रॅम, डिस्प्ले आणि तगड्या प्रोसेसरसह लाँच होणार Realme चा नवीन 5G फोन, जाणून घ्या फीचर्स

Realme Upcoming Smartphone । अनेक स्मार्टफोन कंपन्या वर्षभरात विविध फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. प्रत्येक कंपनीच्या फोनमध्ये कंपनी विविध स्पेसिफिकेशन आणि फीचर्स देत असते. त्यामुळे त्यांच्या किमतीत देखील बदल असतो.

जर तुम्ही आता नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा करा. आता बाजारात Realme चा शानदार आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन लाँच होणार आहे. तुमच्यासाठी हा उत्तम स्मार्टफोन असणार आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनबद्दल.

Realme 12+ वैशिष्ट्य

डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देणार आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. रॅम आणि स्टोरेजचा विचार केला तर स्मार्टफोन 24 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल. तसेच प्रोसेसर म्हणून तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 7050 चिपसेट पाहायला मिळेल. इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी कंपनीकडून या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात येणार आहे.

यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश असणार आहे. कंपनीच्या नवीन फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येणार आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. फोनला उर्जा देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी असणार आहे. ही बॅटरी 67 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार असून OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करेल.

Leave a Comment