Realme Smartphone Offer : Realme चा शक्तिशाली फोन खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात, त्वरित घ्या सेलचा लाभ

Realme Smartphone Offer : विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनवर ऑफर उपलब्ध असते. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत दमदार फीचर्स असणारा फोन खरेदी करता येतो. तुम्ही आता 12GB रॅम असलेला Realme कॅमेरा फोन 4000 रुपये स्वस्तात खरेदी करू शकता.

Realme चे Realme 12 Pro 5G आणि Realme 12 Pro+ 5G, मिडरेंज सेगमेंटमधील सर्वात उत्तम कॅमेरे ऑफर करण्यासाठी पसंत केले जात आहेत. कंपनीने 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Realme 12 Pro 5G चा नवीन प्रकार आणला असून त्याची फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता फ्लॅश सेल सुरू होणार आहे. तुम्हाला विशेष ऑफर्सचा लाभ मिळेल.

फ्लॅश सेलमध्ये मर्यादित युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असल्याने फोन त्वरीत ऑर्डर करा. किमतीचा विचार केला तर वक्र डिस्प्लेसह नवीन Realme 12 Pro 5G प्रकाराची किंमत 28,999 रुपये आहे . तो फ्लिपकार्ट व्यतिरिक्त कंपनीच्या वेबसाइटवरून दुपारी 12 वाजता ऑर्डर करता येईल. तुम्ही आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 4,000 रुपयांची झटपट सवलत मिळेल.

जर तुम्हाला हा फोन एक्स्चेंज करताना घ्यायचा असल्यास 2,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. हा फोन 12 महिन्यांसाठी विनाखर्च EMI वर खरेदी करता येईल. हा फोन सबमरीन ब्लू आणि नेव्हिगेटर सीड या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

जाणून घ्या फीचर्स

Realme फोनमध्ये 6.7-इंच वक्र AMOLED फुल HD+ डिस्प्ले असून हा फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 950nits ची शिखर ब्राइटनेस ऑफर करतो. Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह, यात 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज असून Android 14 वर आधारित Realme UI 5.0 फोनमध्ये उपलब्ध आहे.

फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 सेन्सर, 2x ऑप्टिकल झूमसह 32MP Sony IMX709 टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिल्या आहेत. 16MP सेल्फी कॅमेरा असणाऱ्या या फोनची 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे. यात डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर सेटअप दिला आहे.

Leave a Comment