Realme P1 Pro । जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता तुमच्या बजेटमध्ये 5G फोन खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे ऑफर जाणून घ्या.
Realme P1 Pro
ही शानदार ऑफर Realme P1 Pro या फोनवर मिळत आहे. हा 5G फोन 21,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनच्या वेरिएंटची किंमत इतकी होती. आता हे मॉडेल फ्लिपकार्टवर 18,499 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकले जात असून फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक 1,000 रुपयांची सूट घेऊ शकतात. ही बँक ऑफर सर्व बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर मिळत आहे.
हे लक्षात घ्या की बँक ऑफरनंतर, फोनची प्रभावी किंमत 17,499 रुपयांपर्यंत खाली येईल, जी लॉन्च किंमतीपेक्षा पूर्ण 4500 रुपये कमी आहे. फोन पॅरोट ब्लू आणि फिनिक्स रेड कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की फ्लिपकार्ट फोनवर एक्सचेंज बोनस देत आहे.
Realme P1 Pro चे फीचर्स
या नवीन स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 निट्स पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा सुपर स्लिम 3D वक्र AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. फोनची जाडी फक्त 8.35 मिमी आणि वजन फक्त 184 ग्रॅम इतकी आहे. फोन 4nm octa-core Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आणि Adreno 710 GPU ने सुसज्ज आहे. हे Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालते. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टसह 5000mAh बॅटरी आणि 45W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून ज्यात OIS सह 50-मेगापिक्सेल Sony LYT-600 मुख्य कॅमेरा सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. हा फोन वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 ला सपोर्ट करतो. फोनमध्ये डॉल्बी ॲटमॉससह ड्युअल स्पीकर, रेनवॉटर स्मार्ट टच तंत्रज्ञान, एअर जेश्चर आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर यांसारखी शानदार फीचर्स आहेत.