Realme NARZO N65 : जबरदस्त प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा असणारा सर्वात पातळ स्मार्टफोन केवळ 11,499 रुपयांमध्ये लॉन्च

Realme NARZO N65 : Realme ने आपला नवीन फोन लाँच केला आहे. कंपनीचा हा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. जो तुम्हाला केवळ 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. Realme NARZO N65 या फोनमध्ये तुम्हाला जबरदस्त प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा पाहायला मिळेल.

जाणून घ्या Realme NARZO N65 किंमत

हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये येतो: 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,499 रुपये इतकी आहे.

हे लक्षात घ्या की Realme NARZO N65 ची पहिली विक्री 31 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे आणि 4 जून 2024 पर्यंत चालणार आहे. किमतीचा विचार केला तर पहिल्या सेलमध्ये 4 जीबी रॅम 10,499 रुपयांना आणि 6 जीबी रॅम 11,499 रुपयांना मिळेल. Realme Narzo N65 फोन Amazon वर उपलब्ध असणार आहे, हे लक्षात घ्या.

Realme NARZO N65 चे फीचर्स

Realme च्या या फोनमध्ये 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 625 nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंच HD + स्क्रीन दिली आहे.4GB/6GB LPDDR4x RAM सह Octa core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर, 128GB (UFS 2.2) स्टोरेज, microSD सह 2TB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

हायब्रिड ड्युअल सिम Realme UI 5.0 सह Android 14 आहे. Samsung JN1 सेन्सर, LED फ्लॅश, OmniVision OV08D10 सेन्सर आणि 8MP फ्रंट कॅमेरासह 50MP रियर कॅमेरा आहे. या फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.
धूळ आणि पाणी प्रतिरोधक (IP54) 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, GLONASS, Galileo, USB Type-C, क्विक चार्ज 5000mAh बॅटरी 15W जलद चार्जिंगसह हा फोन येईल.

Leave a Comment