Realme Narzo 70 Pro 5G । स्टायलिश लूक आणि धमाकेदार फीचर्स असणाऱ्या फोनवर मिळतेय ‘इतकी’ सवलत, त्वरा करा

Realme Narzo 70 Pro 5G । तुम्ही आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला रियलमीचा Realme Narzo 70 Pro 5G हा स्मार्टफोन हजारोंच्या सवलतीत खरेदी करू शकता. Amazon वर अशी शानदार ऑफर मिळत आहे.

कंपनीने Realme Narzo 70 Pro 5G ला अतिशय खास ग्लास बॅक डिझाइनसह आणले असून या शानदार फोनमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत. या फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले आहे आणि मजबूत कामगिरीसाठी, MediaTek प्रोसेसर त्याचा एक भाग असणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान करण्यात येत आहे आणि एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करतो.

8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 21,999 रुपयांना Amazon वर लिस्ट केला आहे. तर या फोनवर थेट 5000 रुपयांचा कूपन डिस्काउंट देण्यात येत आहे, त्यानंतर कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये होईल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात एक्सचेंज डिस्काउंट घेऊ शकतात.

Realme Narzo 70 Pro 5G चे फीचर्स

Realme स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर यात MediaTek Dimensity 7050 5G प्रोसेसर देण्यात आला आहे आणि त्याच्या मागील पॅनलवर, यात 50MP फ्लॅगशिप Sony IMX890 प्राथमिक सेन्सरसह 8MP आणि 2MP सेन्सरसह तिहेरी कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा असून या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. फोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देत असून त्यात एअर जेश्चरचा सपोर्ट दिला आहे, ज्याच्या मदतीने यूजर फोनला स्पर्श न करता नियंत्रित करता येईल.

Leave a Comment