Realme C65 : मस्तच! Realme आणणार सर्वात स्वस्त फोन, जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही

Realme C65 : सर्वच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आपले स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. या सर्व स्मार्टफोनमध्ये कंपन्या अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे फोनला सर्वात जास्त मागणी आहे. अशातच आता Realme आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आणणार आहे.

कंपनीचे Realme C65 लाँच होण्यापूर्वी मॉडेल क्रमांक RMX3910 सह UAI टेलिकम्युनिकेशन्स आणि TDRA वर काही वैशिष्ट्यांसह स्पॉट करण्यात आले आहे. हे लक्षात घ्या की हे समान मॉडेल क्रमांकासह EEC आणि TUV प्रमाणपत्रावर देखील सूचीबद्ध आहे.

डेटाबेसमधून उपलब्ध माहितीनुसार जाणून घ्यायचे झाले तर, यात f/1.8 अपर्चरसह EIS सपोर्टसह कॅमेरा लेन्स प्रदान करण्यात येईल. त्यामुळे यावरून असे दिसून येते की फोनमध्ये असणारी बॅटरी SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Realme C67 चे फीचर्स

मागील वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झालेल्या Realme C67 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास ते 4GB + 128GB आणि 6GB + 128GB स्टोरेजमध्ये खरेदी करता येईल. कंपनीच्या आगामी फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 रिझोल्यूशनला सपोर्ट करतो आणि त्याचा टच सॅम्पलिंग रेट 180hz आहे.

या फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंशन 6100+ प्रोसेसर आहे. हे 6 एनएम तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये Mali G57 GPU सपोर्ट आहे. कॅमेराचा विचार केला तर यात 50MP+2MP कॅमेरा सेटअप दिला असून सेल्फी प्रेमींसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. कंपनीच्या जबरदस्त फोनला पॉवर करण्यासाठी, 33 वॅट सुपरव्हीओओसी चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी प्रदान केली आहे.

Leave a Comment