Realme C63 : चार्जिंगची मिटली कटकट! 38 दिवस चालेल या अप्रतिम फोनची बॅटरी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme C63 : भारतीय बाजारात आता एक असा स्मार्टफोन येत आहे, ज्याची 38 दिवस बॅटरी चालेल. कंपनी अनेक दिवसांपासून Realme C63 या फोनवर काम करत होती. जो तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स.

Realme C63 चे फीचर्स

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर ड्युअल-सिम सपोर्टसह सर्वोत्तम Realme UI 5 सह येतो आणि तुम्हाला सहज अनुभवासाठी 90Hz चा रिफ्रेश दर मिळेल. फोनची पीक ब्राइटनेस 450 nits असून या फोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर या फोनला पॉवर करण्यासाठी कंपनीने त्यात ऑक्टा-कोर Unisoc T612 चिपसेट वापरला आहे. कंपनीच्या या शानदार फोनमध्ये Mali-G57 GPU आणि 8GB रॅम देखील आहे.

रॅम येईल वाढवता

खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करते ज्यामुळे तुम्ही 16GB पर्यंत रॅम वाढवू शकता. होल पंच डिस्प्ले डिझाइन या फोनचा लुक आणखी वाढवते. हा फोन कॅमेऱ्याच्या बाबतीतही अप्रतिम असून यात ड्युअल रियर कॅमेरासह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या या फोनमध्ये फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

काही मिनिटांत चार्ज होतो फोन

इतकेच नाही तर तुम्हाला फोनमध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, जे काही मिनिटांत डिव्हाइस चार्ज करते. हा फोन 5,000mAh बॅटरीसह येते. कंपनीचा असाही दावा आहे की या फोनला एका मिनिटासाठी चार्ज करून, तुम्ही एक तासाच्या टॉकटाइमचा आनंद घेता येईल, ज्यामुळे ते इतर स्मार्टफोन्सपेक्षा खास बनते. इतकेच नाही तर स्मार्टफोनच्या एका चार्जवर 38 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देण्याचा दावा कंपनी करत आहे.

जाणून घ्या Realme C63 ची किंमत

किमतीचा विचार केला तर 6GB + 128GB मॉडेलसाठी, Realme C63 स्मार्टफोनची किंमत IDR 19,99,000 म्हणजेच अंदाजे 10,250 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत IDR 2,299,000 म्हणजेच अंदाजे 11,800 रुपये आहे.

Leave a Comment