Realme 12 Pro+ 5G : तुम्ही आता लक्झरी डिझाइन आणि शानदार फीचर्स असणारा Realme फोन 6000 रुपये स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन सर्वात जास्त विक्री करणारा फोन आहे.
बँक आणि एक्सचेंज ऑफर
रॅम आणि स्टोरेजनुसार, फोन तीन प्रकारांमध्ये येतो – 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB. तुम्हाला फोनचे बेस व्हेरिएंट (8GB+128GB) स्वस्तात खरेदी करता येईल.
8GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनच्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. Axis, HDFC, ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे बँक ऑफरचा लाभ घेता येतो. बँकेच्या ऑफरचा पूर्ण फायदा घेतला तर Realme 12 Pro+ 5G या बेस व्हेरिएंटची प्रभावी किंमत 26,999 रुपये असेल.
फोनवर 3,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे, याचा अर्थ तुम्ही जुन्या फोनसह एक्सचेंज करून एकूण 6,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. या दोन्ही ऑफरनंतर, फोनची प्रभावी किंमत 23,999 रुपयांपर्यंत खाली येईल. तसेच ऑफर इतर व्हेरियंटवर देखील मिळू शकते.
3D वक्र AMOLED डिस्प्ले
Realme 12 Pro Plus मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस 3D वक्र AMOLED डिस्प्ले दिला असून ज्याचा रीफ्रेश दर 120 Hz आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन उपलब्ध आहे. तर या फोनमध्ये व्हेगन लेदर बॅक दिला आहे.
हेवी रॅम आणि फास्ट चार्जिंग
या शक्तिशाली फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिला आहे. तर रॅम आणि स्टोरेजनुसार, फोन तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतो आणि यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे.
या फोनमध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यात 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 120x सुपरझूम वैशिष्ट्यासह 64-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. 2 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो आणि त्यात अनेक गोपनीयता आणि सेफ्टी फीचर्स दिली आहेत.