Realme 12 5G Series : शक्तिशाली कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स! Realme च्या नवीन फोनची किंमत आहे फक्त इतकीच

Realme 12 5G Series : Realme ने आपली नवीन सिरीज आणली आहे. जी तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच या सिरीजमध्ये शक्तिशाली कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स दिली आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.

किंमत

किमतीचा विचार केला तर Realme 12 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे आणि 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये इतकी आहे. हे वुडलँड ग्रीन आणि ट्वायलाइट पर्पल रंगांमध्ये येते. कंपनीचे असे मत आहे की मेनलाइन चॅनलवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत 2998 रुपये किमतीचे Realme Buds Wireless 3 मोफत मिळणार आहे.

तसेच Realme 12+ 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. हे पायोनियर ग्रीन आणि नेव्हिगेटर बेज रंगांमध्ये येत असून कंपनीचे असे मत आहे की मेनलाइन चॅनलवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत 3998 रुपये किमतीचे Realme Buds T300 मोफत मिळेल.

बँक आणि इतर ऑफर्सचा लाभ घेऊन, 2,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर Realme 12 5G ची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये असेल आणि Realme 12+ 5G ची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये असणार आहे. दोन्ही मॉडेल्सची पहिली विक्री 6 ते 10 मार्च दरम्यान असणार आहे. तुम्ही ते कंपनीच्या अधिकृत साइट, फ्लिपकार्ट आणि मेनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. तुम्ही हे EMI वर खरेदी करू शकता.

Realme 12+ 5G ची फीचर्स

कंपनीच्या या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि 240 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देत असून जो 2000 nits ब्राइटनेसला देखील सपोर्ट करतो. फोन फ्लॅट एजसह येतो. त्याच्या मागील पॅनलवर लेदर फिनिश आहे. डिस्प्लेमध्ये मध्यभागी पंच-होल कटआउट आणि HDR 10+ साठी समर्थन आहे.

रॅम आणि प्रोसेसर

कंपनीचे असे मत आहे की हा फोन स्मार्ट रेन वॉटर टच फीचरसह येतो. फोन MediaTek Dimensity 7050 chipset ने सुसज्ज आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार, फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे – 8GB+128GB आणि 8GB+256GB. हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो.

Leave a Comment