Maruti Fronx: एसयूव्ही सेगमेंटमध्ये नुकतंच मारुती सुझुकी ने आपली एसयूव्ही कार Maruti Fronx लॉन्च केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात ही कार टाटा पंचला टक्कर देत धुमाकूळ घालत आहे.
बाजारात Maruti Fronx लॉन्चच्या पुढच्या महिन्यापासून देशातील सर्वाधिक विकल्या कारच्या यादीत सामील झाली आहे. यामुळे आता तूम्ही देखील Maruti Fronx खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो या एसयूव्हीचा वेटींग पिरियड 14 आठवड्यांवर पोहोचला आहे. जर तुम्ही ही SUV आजच बुक केली तर तुम्हाला त्याची डिलिव्हरी 14 आठवड्यांनंतर मिळेल. कंपनीने ही SUV एप्रिल 2023 मध्ये लॉन्च केली होती आणि तेव्हापासून तिची विक्री सातत्याने वाढत आहे.
Maruti Fronx तपशील
कंपनीने या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत बाजारात 7.46 लाख रुपये ठेवली आहे. हि कार मारुती बलेनोवर आधारित असून नऊ रंगांमध्ये उपलब्ध आहे. सध्या ही कार 14 आठवड्यांच्या वेटींग पिरियडवर उपलब्ध आहे. हा वेटींग पिरियड सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, झेटा आणि अल्फाच्या सर्व व्हेरियंटवर लागू आहे.
Maruti Fronx इंजिन
कंपनी मारुती फ्रॉन्क्समध्ये 1.2-लिटर, चार-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन देते. ज्याची क्षमता 89bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची आहे. याशिवाय 1.0-लिटर, थ्री-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन देखील यात देण्यात आले आहे. जे 99bhp आणि 147Nm टॉर्क बनवते. यामध्ये तुम्हाला पाच-स्पीड मॅन्युअल युनिट, एक AMT युनिट आणि सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.