दिल्ली – अमेरिकेत (America) पुन्हा एकदा सामूहिक गोळीबाराची (Mass shooting) मोठी घटना समोर आली आहे. दक्षिण टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत मंगळवारी एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केल्याने 18 विद्यार्थी आणि तीन शिक्षक ठार झाले. या घटनेत एका 18 वर्षीय हल्लेखोराचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत शोककळा पसरली आहे.
या सामूहिक गोळीबारात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी माध्यमांना दिली. या घटनेतील संशयिताचे नाव 18 वर्षीय साल्वाडोर रामोस असे आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. , पोलीस म्हणाले की शूटरकडे हँडगन आणि शक्यतो रायफल होती. गव्हर्नर अॅबॉट म्हणाले की, हल्लेखोराने शाळेच्या दोन अधिकाऱ्यांवरही गोळ्या झाडल्या, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
600 मुले शाळेत शिकतात
टेक्सासमधील उवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचे पोलीस प्रमुख पीट एरेडोन्डो यांनी सांगितले. तेथे 600 मुले शिकतात. त्यांनी सांगितले की, हल्लेखोर हा शाळेतीलच जुना विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेपूर्वी त्याने आपली कार शाळेबाहेर सोडली. यानंतर तो आपल्या दोन्ही बंदुकांसह शाळेत घुसला आणि गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू होताच शाळेत चेंगराचेंगरी झाली आणि मुले जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरासोबत चकमक सुरू झाली. या चकमकीत हल्लेखोर ठार झाला.
16 विद्यार्थी आणि 1 शिक्षक जखमी
हल्लेखोराने एकट्याने हा हल्ला केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे, असे त्यांनी सांगितले. या घटनेत 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झाला. तर 16 विद्यार्थी आणि 1 शिक्षक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेनंतर एफबीआय एजंटही शाळेत पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यासोबतच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला होता.
टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबाराची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचे म्हटले जात आहे. याआधी 2018 मध्ये ह्युस्टन परिसरातील सांता फे हायस्कूलमध्ये एका बंदूकधाऱ्याने 10 जणांना गोळ्या घालून ठार केले होते.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना माहिती दिली
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना एअर फोर्स वनवर असताना शाळेत झालेल्या गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. जपानमधून प्रवास पूर्ण करून ते देशात परतत आहेत. उवाल्डे शहरात सुमारे 16,000 लोक राहतात. हे शहर मेक्सिकोच्या सीमेपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे.
अमेरिकेत 4 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी देशात 4 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी सर्व सरकारी इमारती, लष्करी चौक्या, नौदल स्थानके आणि अमेरिकेच्या दूतावासात 4 दिवस राष्ट्रध्वज अर्धा फडकवण्याचे आदेश दिले आहेत.