Bank Holiday September 2024: RBI ची मोठी घोषणा, सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण

Bank Holiday September 2024: येत्या काही दिवसात ऑगस्ट महिना संपणार असून सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. या सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल 15 दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहिती RBI ने दिली आहे.

नुकतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारचा समावेश आहे.  

बँका कधी बंद राहणार?

1 सप्टेंबर रोजी रविवार आहे. या दिवशी सर्व बँकांना सुट्टी असेल.

4 सप्टेंबर रोजी श्रीमंत शंकरदेवाच्या तिरुभवतिथीनिमित्त गुवाहाटीच्या बँका बंद राहतील.

8 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

14 सप्टेंबर हा दुसरा शनिवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

15 सप्टेंबर रविवार आहे. या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

बारावाफत 16 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, आयझॉल, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कोची, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रांची, श्रीनगर, तिरुवनंतपुरम येथे बँक सुट्टी आहे.

17 सप्टेंबर रोजी मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने गंगटोक आणि रायपूरच्या बँका बंद राहतील.

पँग-लहाबसोलमुळे गंगटोकच्या बँका 18 सप्टेंबरला बंद राहतील.

20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबीच्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

22 सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. हा दिवस रविवार आहे.

21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची आणि तिरुअनंतपुरमच्या बँकांना सुट्टी असेल.

23 सप्टेंबरला महाराजा हरिसिंह यांच्या जयंतीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

28 सप्टेंबर हा सप्टेंबरचा चौथा शनिवार आहे. या दिवशी सर्व बँकांना सुट्टी असेल.

29 सप्टेंबरला रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

15 दिवस बँक सुट्टीचा अर्थ असा नाही की देशभरातील बँका 15 दिवस बंद राहतील. RBI सण आणि विशिष्ट ठिकाणच्या विशेष प्रसंगी सुट्ट्या जारी करते. उदाहरणार्थ, जम्मू आणि श्रीनगरमध्ये 23 सप्टेंबरला महाराजा हरिसिंह यांच्या जन्मदिनी बँका बंद राहतील. मात्र, देशाच्या इतर भागात बँका सुरू राहतील.

Leave a Comment